K2KARAKORAM
मराठी
ॲप उघडा

७वी शिष्यवृत्ती · मराठी

म्हणी व त्यांचे अर्थ

6 संकल्पना · वाचन मोफत

म्हणी व अर्थ – भाग 1 (अति ते कर)

  • अति तेथे मातीपरीक्षेतकोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारक ठरतो
  • अति शहाणा त्याचा बैल रिकामाजो माणूस फार शहाणपणा करायला जातो, त्याच्या हातून काम बिघडते
  • अडला हरी गाढवाचे पाय धरीशहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते
  • असतील शिते तर जमतील भूतेआपल्याकडे भरभराटीचा काळ असला, तर आपल्याभोवती माणसे गोळा होतात
  • आधी पोटोबा मग विठोबापरीक्षेतआधी स्वतःच्या स्वार्थाचा विचार करणे व नंतर दुसऱ्याचे काम करणे
  • अंथरूण पाहून पाय पसरावेपरीक्षेतऐपतीच्या मानाने खर्च करावा
  • आवळा देऊन कोहळा काढणेक्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे
  • आयत्या बिळात नागोबादुसऱ्यांच्या कष्टांवर स्वार्थ साधणे
  • इकडे आड तिकडे विहीरपरीक्षेतदोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे
  • कर नाही त्याला डर कशालाज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही, त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही
परीक्षेसाठी विशेष

अति तेथे माती, आधी पोटोबा मग विठोबा, अंथरूण पाहून पाय पसरावे, इकडे आड तिकडे विहीर

म्हणी व अर्थ – भाग 2 (करावे ते गाव)

  • करावे तसे भरावेपरीक्षेतदुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच
  • कामापुरता मामागरजेपुरते गोड बोलणारा; मतलबी माणूस
  • काखेत कळसा गावाला वळसापरीक्षेतहवी असलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे
  • खाई त्याला खवखवेजो वाईट काम करतो, त्याला मनात धास्ती वाटते
  • खाण तशी मातीआईवडिलांप्रमाणे मुलांची वर्तणूक असणे
  • खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशीएक तर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे; यांपैकी एकाचीच निवड करणे
  • खायला काळ भुईला भारनिरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो
  • गरजवंताला अक्कल नसतेगरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्टीसुद्धा मान्य कराव्या लागतात
  • गर्वाचे घर खालीगर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो
  • गाव करी ते राव न करीसर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी जे काम होते, ते एकट्या मोठ्या माणसाच्या हातून होत नाही
लक्षात ठेवा

‘खाण तशी माती’ याच अर्थाच्या ‘बाप तसा बेटा’ आणि ‘कुंभार तसा लोटा’ या म्हणीही आहेत.

परीक्षेसाठी विशेष

करावे तसे भरावे, काखेत कळसा गावाला वळसा

म्हणी व अर्थ – भाग 3 (गाढवाला ते दुरून)

  • गाढवाला गुळाची चव कायअडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही
  • चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचेप्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच
  • जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेदुसऱ्याच्या अडीअडचणी, त्या परिस्थितीत स्वतः गेल्यावरच कळतात
  • जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाहीमुळचा स्वभाव कधीच बदलत नाही
  • थेंबे थेंबे तळे साचेपरीक्षेतथोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी मोठा साठा होतो
  • डोंगरापेक्षा वीट मऊमोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे
  • दात आहेत तर चणे नाहीत चणे आहेत तर दात नाहीतअनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे
  • दाम करी कामपैशाने सर्व कामे साध्य होणे
  • दिव्याखाली अंधारमोठ्या माणसाच्या ठिकाणीदेखील काही दोष हे असतातच
  • दुरून डोंगर साजरेपरीक्षेतकोणतीही गोष्ट वा वस्तू लांबून चांगली दिसते; जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते
परीक्षेसाठी विशेष

थेंबे थेंबे तळे साचे, दुरून डोंगर साजरे

म्हणी व अर्थ – भाग 4 (देश ते पाचामुखी)

  • देश तसा वेशपरिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागणे
  • देव तारी त्याला कोण मारीदेवाची कृपा असल्यावर कोणीही आपले वाईट करू शकत नाही
  • देव देतो कर्म नेतेपरीक्षेतअनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे
  • दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभपरीक्षेतभांडण करणाऱ्यांचा काहीही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचाच फायदा होतो
  • न कर्त्याचा वार शनिवारपरीक्षेतअनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे
  • नव्याचे नऊ दिवसपरीक्षेतएखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कौतुक केले जाणे
  • नाव मोठे लक्षण खोटेपरीक्षेतभपका मोठा असणे; पण वस्तुस्थिती नेमकी विरुद्ध असणे
  • पळसाला पाने तीनचपरीक्षेतकोठेही गेले तरी तीच परिस्थिती असणे
  • पाचामुखी परमेश्वरपुष्कळ लोक जे बोलतात, तेच योग्य मानणे
परीक्षेसाठी विशेष

देव देतो कर्म नेते, दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ, न कर्त्याचा वार शनिवार, नव्याचे नऊ दिवस, नाव मोठे लक्षण खोटे, पळसाला पाने तीनच

म्हणी व अर्थ – भाग 5 (पालथ्या ते मुलाचे)

  • पालथ्या घागरीवर पाणीकेलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे
  • पुढच्यास ठेच मागचा शहाणापरीक्षेतदुसऱ्याचा अनुभव पाहून आपण त्यापासून धडा घेणे
  • प्रयत्नांती परमेश्वरपरीक्षेतकितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते
  • बळी तो कान पिळीपरीक्षेतबलवान माणूस इतरांवर हुकमत गाजवतो
  • बुडत्याचा पाय खोलातमाणसाची अवनती होऊ लागली म्हणजे ती अनेक बाजूंनी होऊ लागते
  • भित्यापाठी ब्रह्मराक्षसपरीक्षेतभित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात
  • भीक नको पण कुत्रा आवरज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडून मदत न मिळता उलट संकट ओढवणे
  • मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नयेएखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये
  • मुलाचे पाय पाळण्यात दिसतातपरीक्षेतएखाद्याच्या भावी कर्तबगारीचा अंदाज त्याच्या बालपणीच बांधता येतो
परीक्षेसाठी विशेष

पुढच्यास ठेच मागचा शहाणा, प्रयत्नांती परमेश्वर, बळी तो कान पिळी, भित्यापाठी ब्रह्मराक्षस, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात

म्हणी व अर्थ – भाग 6 (मनी ते हलवायाच्या)

  • मनी वसे ते स्वप्नी दिसेजशी इच्छा असेल, तशी स्वप्ने पडणे
  • जसा राजा तशी प्रजाराजाप्रमाणे प्रजेचे वर्तन असणे
  • लेकी बोले सुने लागेएकाला उद्देशून बोलणे; पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे
  • शितावरून भाताची परीक्षाएखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे
  • शेरास सव्वाशेरपरीक्षेतसमर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे
  • साखरेचे खाणार त्याला देव देणारभाग्यवान माणसाला सर्व परिस्थिती अनुकूल असते
  • सत्तेपुढे शहाणपण नाहीज्याच्या हाती सत्ता आहे, त्याच्या मतापुढे इतरांच्या मताला किंमत नसणे
  • हत्ती गेला नि शेपूट राहिलेकार्याचा मोठा भाग पार पडून थोडेसे कार्य शिल्लक राहणे
  • हलवायाच्या घरावर तुळशीपत्रदुसऱ्याच्या जिवावर स्वतः उदारपणा दाखवणे
परीक्षेसाठी विशेष

शेरास सव्वाशेर