- ज्याला कधीही मृत्यू येत नाही असाअमर
- केलेले उपकार जाणणाराकृतज्ञ
- केलेले उपकार न जाणणाराकृतघ्न
- ज्याला कोणीही शत्रू नाही असाअजातशत्रू
- ज्याला सर्व काही माहीत आहे असासर्वज्ञ
- ज्याला काहीही माहीत नाही असाअज्ञ
- ज्याची माहिती नाही असाअज्ञात
- ज्याला ज्ञान नाही असाअज्ञानी
- देवावर विश्वास ठेवणाराआस्तिक
- देवाचे अस्तित्व न मानणारानास्तिक
- ज्याला भीती वाटत नाही असानिर्भय
- ज्याने विवाह केलेला नाही असाअविवाहित
- ज्याला आई-वडील नाहीत असाअनाथ
- ज्याच्यावर उपकार झाले आहेत असाउपकृत
- दुसऱ्याचे भले करणारापरोपकारी
- स्वतःचाच विचार करणारास्वार्थी
- समाजाची सेवा करणारासमाजसेवक
- देशावर प्रेम करणारादेशभक्त
- सत्याचा आग्रह धरणारासत्याग्रही
- श्रम करून जगणाराश्रमजीवी
- कमी बोलणारामितभाषी
- खूप बोलणारावाचाळ
- मिळूनमिसळून वागणारामनमिळाऊ
- दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारामनकवडा
- दुसऱ्यांचे दुःख जाणून दया करणाराकनवाळू
- कामाची टाळाटाळ करणाराकामचुकार
- आळसाने किंवा अंग राखून काम करणाराअंगचोर
- नशिबावर विश्वास ठेवून वागणारादैववादी
- कोणतीही अपेक्षा न ठेवणारानिरपेक्ष
- सर्वांना समान मानणारासमतावादी
- ज्ञान मिळवण्याची इच्छा असणाराजिज्ञासू
- कलेची आवड असणाराकलाप्रेमी
- कष्ट करण्याची तयारी असणारापरिश्रमी
- वाट दाखवणारावाटाड्या
- गुप्त बातम्या शोधणारागुप्तहेर
- लोकांचे नेतृत्व करणारानेता
- ज्याला जिंकता येत नाही असाअजिंक्य
- ज्याची तुलना करता येत नाही असाअतुलनीय
- विविध बाबींमध्ये प्रवीण असलेलाअष्टपैलू
- दगडासारखे कठोर हृदय असणारापाषाणहृदयी
- चहाड्या करणाराचहाडखोर
- कर्तव्याकडे पाठ फिरवणाराकर्तव्यपराङ्मुख
- थोडक्यात समाधान मानणाराअल्पसंतुष्ट
- कमी आयुष्य असलेलाअल्पायुषी
- जन्मतःच श्रीमंत असलेलागर्भश्रीमंत
- शत्रूला सामील झालेलाफितूर
- नेहमी खरे बोलणारासत्यवादी
- खोटे बोलणारालबाड
- दुसऱ्याचे चांगले पाहून जळणारामत्सरी
- दान करण्याची वृत्ती असलेलादानशूर
- पैसा खर्च करायला तयार नसणाराकंजूस
- कधीही न थकणाराअथक
- ज्याच्या मनात दया नाही असानिर्दयी
- ज्याला लाज वाटत नाही असानिर्लज्ज
- ज्याला कोणताही आधार नाही असानिराधार
- चांगले आचरण करणारासदाचारी
- वाईट आचरण करणारादुराचारी
- सर्वांच्या पुढे असणाराअग्रणी
- खूप खाणाराखादाड
- धर्मावर श्रद्धा असणाराधार्मिक
- ज्याचा कधी पराभव झाला नाही असाअपराजित
- लोकांना प्रिय असलेलालोकप्रिय
- सर्वत्र प्रसिद्ध असलेलाविख्यात
- ज्याला काम नाही असाबेकार
- अनेक भाषा बोलणाराबहुभाषिक
- ज्याचे नाव माहीत नाही असाअनामिक
- कविता करणाराकवी
- कथा लिहिणाराकथाकार
- नाटक लिहिणारानाटककार
- चित्र काढणाराचित्रकार
- शिल्प तयार करणाराशिल्पकार
- इतिहास लिहिणाराइतिहासकार
- बातम्या गोळा करून देणारावार्ताहर
- विक्री करणाराविक्रेता
- अन्न देणाराअन्नदाता
- शेती करणाराशेतकरी
- लाकडापासून वस्तू बनवणारासुतार
- मातीची भांडी बनवणाराकुंभार
- सोन्या-चांदीचे दागिने बनवणारासोनार
- सापांचा खेळ करणारागारुडी
- माकडांचा खेळ करणारामदारी
- देवाची पूजा करणारापुजारी
- रोग्यांवर उपचार करणारावैद्य
- न्याय देणारा अधिकारीन्यायाधीश
- सैन्याचा प्रमुखसेनापती
- गावाचा प्रमुखसरपंच
- घर बांधणारा कारागीरगवंडी
- कपडे शिवणाराशिंपी
- कपडे धुणारापरीट
- केस कापणारान्हावी
- लोखंडी वस्तू बनवणारालोहार
- चामड्याच्या वस्तू बनवणाराचांभार
- तेल काढून विकणारातेली
- मासे पकडणाराकोळी
- पाणी भरून देणारापाणक्या
- बैलगाडी चालवणारागाडीवान
- घोड्यावर बसणाराघोडेस्वार
- धनुष्य धारण करणाराधनुर्धारी
- पहारा करणारापहारेकरी
- पाहण्यासाठी जमलेले लोकप्रेक्षक
- ऐकण्यासाठी जमलेले लोकश्रोते
- लहानापासून थोरांपर्यंत सर्वजणआबालवृद्ध
- घरदार आणि मायभूमी सोडून राहणारानिर्वासित
- डोंगरात राहणारे लोकगिरीजन
- घोडे बांधण्याची जागापागा
- गुरे बांधण्याची जागागोठा
- धान्य साठवण्याची जागाकोठार
- मोफत अन्न मिळण्याचे ठिकाणअन्नछत्र
- विद्यार्थ्यांना राहण्याची जागावसतिगृह
- पुस्तके ठेवण्याची जागाग्रंथालय
- नाणी पाडण्याची जागाटांकसाळ
- देवळाचा आतील भागगाभारा
- दगडावर कोरलेला लेखशिलालेख
- तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेखताम्रपट
- लोकांची वस्ती नसलेला भागनिर्जन
- पाण्याने चहूबाजूंनी वेढलेला भूभागद्वीप
- प्रवाशांना मोफत राहण्याची जागाधर्मशाळा
- तहानलेल्यांना मोफत पाणी देण्याची जागापाणपोई
- आजारी लोकांवर उपचार करण्याची जागारुग्णालय
- कुस्तीचा सराव करण्याची जागाआखाडा
- नाटक पाहण्याची इमारतनाट्यगृह
- प्राणी ठेवण्याची जागाप्राणिसंग्रहालय
- जुन्या वस्तू जतन करून ठेवण्याची जागासंग्रहालय
- जमिनीखाली खणलेला मार्गभुयार
- पक्ष्यांची राहण्याची जागाघरटे
- मधमाशांचे घरपोळे
- दोन नद्या एकत्र मिळण्याची जागासंगम
- जन्मापासून मरेपर्यंतआजन्म
- मरण येईपर्यंतआमरण
- जन्मापासूनच असलेलेउपजत
- पंधरा दिवसांचा कालावधीपंधरवडा
- दररोज प्रसिद्ध होणारेदैनिक
- आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारेसाप्ताहिक
- पंधरा दिवसांतून एकदा प्रसिद्ध होणारेपाक्षिक
- महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारेमासिक
- वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारेवार्षिक
- पहिल्या दर्शनातच / पाहताक्षणीप्रथमदर्शनी
- सूर्याचे उत्तरेकडे जाणेउत्तरायण
- पहाटेची सुखद वेळरामप्रहर
- सूर्याचे दक्षिणेकडे जाणेदक्षिणायन
- सूर्य उगवण्याची वेळसूर्योदय
- सूर्य मावळण्याची वेळसूर्यास्त
- बारा महिने टिकणारे / असणारेबारमाही
- मागाहून जन्मलेला धाकटा भाऊअनुज
- पूर्वी जन्मलेला मोठा भाऊअग्रज
- जमिनीवर आणि पाण्यात राहणारा प्राणीउभयचर
- पाण्यात राहणारा प्राणीजलचर
- जमिनीवर राहणारा प्राणीस्थलचर
- रात्री फिरणारानिशाचर
- आकाशात दिसणारा ताऱ्यांचा पट्टाआकाशगंगा
- मांस खाणारामांसाहारी
- वनस्पती खाणाराशाकाहारी
- फळे खाऊन राहणाराफलाहारी
- सर्व काही खाणारासर्वभक्षी
- कीटक खाणाराकीटकभक्षी
- आकाशात संचार करणारानभचर
- पायी चालणारापादचारी
- वनात राहणारावनवासी
- कोणतीही तक्रार न करताविनातक्रार
- पायापासून डोक्यापर्यंतआपादमस्तक
- पायात काहीही न घालताअनवाणी
- पूर्वी कधीही न घडलेलेअभूतपूर्व
- कानाला गोड वाटणारेकर्णमधुर
- मनाला आनंद देणारेआल्हाददायक
- पाहण्यास योग्यप्रेक्षणीय
- ऐकण्यास योग्यश्रवणीय
- वाचण्यास योग्यवाचनीय
- ज्याची आठवण विसरता येत नाही असाअविस्मरणीय
- ज्याचा अंत नाही असाअनंत
- मोजता येणार नाही इतकी संख्याअसंख्य
- स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात जाणेदेशांतर
- वाटेल तसा पैसा खर्च करणेउधळपट्टी
- सतत पैसा खर्च करणाराउधळ्या
- शिल्लक राहिलेलेउर्वरित
- ज्याचा थांग लागत नाही असेअथांग
- मनाला आकर्षून घेणारेमनमोहक
- एखाद्याच्या मागून जाणेअनुगमन
- पडदा दूर करण्याची क्रियाअनावरण
- अचानक घडून आलेला मोठा बदलक्रांती
- जन्मापासून आंधळा असलेलाजन्मांध
- ज्याला दिसत नाही असाअंध
- ज्याला ऐकू येत नाही असाबहिरा
- ज्याला बोलता येत नाही असामूक
- ज्यात पाणी नाही असेनिर्जल
- सहन करता येणार नाही असेअसह्य
- सहज न मिळणारेदुर्मिळ
- करता येणे शक्य नसलेलेअशक्य
- ज्याला उपाय सापडत नाही असेअसाध्य
- सहज मिळणारे किंवा करता येणारेसुलभ
- ज्यात कोणताही दोष नाही असेनिर्दोष
- कधीही नष्ट न होणारेअविनाशी
- कधीही म्हातारे न होणारे आणि अमरअजरामर
- सर्व इच्छा पूर्ण करणारी कल्पित गायकामधेनू
- देवाला अर्पण केलेले अन्ननैवेद्य
- लहान मुलाला झोपवण्यासाठी म्हटलेले गाणेअंगाईगीत
- थोर पुरुषांच्या जन्मतिथीचा उत्सवजयंती
- लग्नात दिली जाणारी भेटआहेर
- शापापासून सुटकाउ:शाप
- हळूहळू घडून येणारा बदलउत्क्रांती
- एका नवीन युगाची स्थापना करणाराशककर्ता
- हमखास लागू पडणारा खात्रीचा उपायरामबाण
- निरर्थक रचलेल्या गोष्टीभाकडकथा
- जगाचा स्वामीजगन्नाथ
- ज्याचे मुख चंद्राप्रमाणे सुंदर आहे अशी स्त्रीचंद्रमुखी
- जिचे डोळे कमळासारखे सुंदर आहेत अशी स्त्रीकमलाक्षी
- हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार चाल असलेली स्त्रीगजगामिनी
- ज्याचे हात गुडघ्यांपर्यंत लांब आहेत असाआजानुबाहू
11महत्त्वाचे शब्दसमूह – एक शब्द (भाग 1)
- अपेक्षित नसताना घडलेली गोष्टअनपेक्षित
- अरण्याचा राजावनराज
- आठ दिवसांचा काळआठवडा
- आपल्या लहरीप्रमाणे वागणारास्वच्छंदी
- आंब्याचे झाडआम्रवृक्ष / आम्रतरू
- आंब्याच्या झाडांची बागआमराई
- उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाहधबधबा
- किल्ल्याभोवतीची भिंततट
- खूप आयुष्य असलेलादीर्घायुषी
- खूप पाऊस पडणेअतिवृष्टी
- गाणे गाणारागायक
- चार रस्ते एकत्र येतात ती जागाचौक
- जन्म झालेले ठिकाणजन्मभूमी
- जादूचे खेळ करून दाखवणाराजादूगार
- दररोजचा ठरलेला कार्यक्रमदिनक्रम
- दरबारातील राजाचे आसनसिंहासन
- दुसऱ्यावर अवलंबून असलेलापरावलंबी
- देशाची सेवा करणारादेशसेवक
- नदीची सुरुवात होते ती जागाउगम
- नाटक-सिनेमात काम करणारानट / अभिनेता
- नावडती असणारीअप्रिय
- पाण्याखालून चालणारी बोटपाणबुडी
- पूर्वीपासून राहणारेआदिवासी
- बसण्यासाठी केलेला ओटाकट्टा
12महत्त्वाचे शब्दसमूह – एक शब्द (भाग 2)
- बैलांच्या अंगावर टाकण्यात येणारे रंगीत नक्षीदार कापडझूल
- बैलांच्या डोक्याला बांधण्याचे आभूषणबाशिंग
- भाषण ऐकणाराश्रोता
- भाषण देणारावक्ता
- मन मोहित करणारामनोहर
- मूर्ती बनवणारामूर्तिकार
- रथ चालवणारासारथी
- राज्यातील लोकप्रजा
- लाखो रुपयांचा धनीलक्षाधीश
- लिहिता-वाचता न येणारानिरक्षर
- लिहिता-वाचता येणारासाक्षर
- लोकांचे नेतृत्व करणारालोकनायक
- लोकांनी मान्यता दिलेलालोकमान्य
- वर्णन करता येणार नाही असेअवर्णनीय
- विद्या घेणारा / शिकणाराविद्यार्थी
- विमान चालवणारावैमानिक
- श्रेष्ठ किंवा महान ऋषीमहर्षी
- सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्षकल्पवृक्ष / कल्पतरू
- संकट दूर करणाराविघ्नहर्ता
- सूर्य उगवण्याचा काळप्रभातकाळ
- सूर्य मावळण्याचा काळसंध्याकाळ
- स्वतः करायचा अभ्यासस्वाध्याय
- स्वतःबद्दल अभिमान असणारास्वाभिमानी
- हत्तीवर बसून त्याला काबूत ठेवणारामाहूत